'मिर्जापूर'चा रॉबिन प्रियांशू पेनयुली विवाहबध्द (Photo) | पुढारी

'मिर्जापूर'चा रॉबिन प्रियांशू पेनयुली विवाहबध्द (Photo)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

वेब सीरीज मिर्जापूर -२ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला रॉबिन अर्थातच प्रियांशू पेनयुलीने त्याची गर्लफ्रेंड वंदना जोशीसोबत विवाह केला आहे. विवाह समारंभ २६ नोव्हेंबर, २०२० रोजी डेहराडून येथे पार पडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांशू डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पोहोचणार आहे. दुसऱ्या आठवड्यात तेथेच रिसेप्शनचे आयोजन करणार आहे. लग्नानंतर दोघांनी ही माहिती समोर आणली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांशू आणि वंदनाची भेट २०१३ मध्ये झाली होती. दोघेही थिएटर आर्टिस्ट होते. दोघांनीही वैभवी मर्चेंटच्या म्युझिकल शो ताज एक्सप्रेसमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या शो दरम्यान, दोघांची जवळीक झाली. प्रियांशू पेनयुलीचे करिअर असिस्टंट म्हणून सुरू झाले होते. त्याने अभिनयाची सुरुवात ‘लव्ह ॲट फर्स्ट साईट’ने केली होती. यानंतर त्याला फरहान अख्तरचा चित्रपट ‘रॉक ऑन-२’मध्ये काम करायला त्याला संधी मिळाली होती. 

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरचा दुसरा चित्रपट ‘भावेश जोशी सुपरहिरो’मध्ये  प्रियांशू मुख्य भूमिकेत होता. ‘मिर्जापूर -२’मध्ये रॉबिनच्या भूमिकेमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. पेनयुलीने तापसी पन्नूचा चित्रपट ‘रश्मि रॉकेट’चे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. यानंतर तो ‘पिप्पा’चे शूटिंग सुरू करेल.  

 

 

Back to top button