संगीतकार वाजिद खानच्या पत्नीचा सासरच्या लोकांवर जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा आरोप | पुढारी

संगीतकार वाजिद खानच्या पत्नीचा सासरच्या लोकांवर जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा आरोप

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

प्रसिध्द संगीतकार दिवंगत वाजिद खान यांच्या पत्नी कमालरुख खानने वाजिद खानच्या परिवारावर आरोप केले आहेत. कमालरुख खानने इन्स्टाग्रामवरून आपले म्हणणे मांडले आहे. यामध्ये तिने आंतरजातीय लग्नानंतर वाजिद खानच्या परिवाराकडून झालेल्या छळाबद्दल लिहिले आहे. कमालरुखने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहिली आहे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी तिने सांगितली आहे. 

कमालरुखने लिहिले आहे की, ती लग्न करण्यापूर्वी १० वर्ष वाजिद खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आपले अनुभव सांगताना ती म्हणते की, ‘मी पारसी आहे आणि ते मुस्लिम होते. आम्ही ते होतो, ज्याला आपण ‘कॉलेज स्वीटहार्ट्स’ म्हणू शकता. अखेर आमचे लग्न झाले. आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केले होते. 

मला एक अंतरजातीय विवाहबद्दल अनुभव शेअर करायचे आहेत. एका महिलेच्या धर्माच्या नावावर आक्षेप आणि भेदभावाचे सामना करतो, जे पूर्णपणे लज्जास्पद आहे … आणि एक डोळा उघडणार आहे.’

कमालरुख असाही आरोप केला आहे, ‘माझी सामान्यत: पारसीमध्ये संस्कार झाले आहेत. विचारांचे स्वातंत्र्याला प्रोत्साहित करण्यात आलं आणि उघडपणे चर्चेला आदर्श मानले गेले. प्रत्येक स्तरावर शिक्षणाला प्रोत्साहित करण्यात आलं. परंतु, लग्नानंतर स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकतांत्रिक मूल्य प्रणाली माझ्या पतीच्या परिवारासाठी सर्वात मोठी समस्या होती.’

वाजिदच्या कुटुंबियांकडून जबरदस्ती त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ती पतीच्या निधनानंतर दु:खातून अद्याप सावरलेली नाही. कमालरुखने आपल्या पोस्टमध्ये खूप काही लिहिलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर अनेक स्लाईडमध्ये आपल्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आता तिची पोस्ट व्हायरल होत आहे. लव्ह जिहाद सारख्या चर्चेदरम्यान अशा पोस्ट येणे आणखी चर्चेत येतात. वाजिद खान यांचे कोरोनाने निधन झाले आहे. 

 

Back to top button