कार्तिकची काशीयात्रा! | पुढारी

कार्तिकची काशीयात्रा!

‘भूलभुलय्या-2’ च्या बंपर यशानंतर आता कार्तिक आर्यनने वाराणसीत जाऊन काशी विश्वनाथांचे दर्शन घेतले. त्याच्यासमवेत चित्रपटाचे निर्माते भुषण कुमारही होते. कार्तिकने दशाश्वमेध घाटावरील दैनंदिन सायंआरतीतही सहभाग घेतला. कार्तिकने गंगा आरती आणि बोटिंगचे फोटो सोशल मीडियातून शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्याने ‘ब्लेस्ड’ असे लिहिले आहे. ‘भूलभुलय्या-2’ च्या प्रदर्शनापूर्वी त्याने मुंबईत सिद्धीविनायकाचेही दर्शन घेतले होते.

Back to top button