संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हिरामंडी' पोस्टर रिलीज | पुढारी

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हिरामंडी' पोस्टर रिलीज

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यासारखे सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली. संजय लीला भन्साळी हे सध्या आगामी ‘हिरामंडी’ या बेवसीरिजवर काम करत आहेत. ‘हिरामंडी’ या बेवसीरिजचे पहिले पोस्टर संजय यांनी सोशल मीडियावर रिलीज केले आहे.

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याच्या आगामी ‘हिरामंडी’ या बेवसीरिजचे नाव असून ते ठळक अक्षरात लिहिले आहे. ही बेवसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संजय यांच्या ‘हिरामंडी’ बेवसीरिजमध्ये ऋचा चढ्ढा दिसणार आहे. अलिकडेच संजय आणि ऋचा चढ्ढा यांच्यात याबाबत चर्चा झाली होती. यानंतर त्यांनी आगामी ड्रिम प्रोजेक्ट असल्‍याचे म्हटले होते. ते गेल्या १२ वर्षांपासून ‘हिरामंडी’ बेवसीरिज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बेवसीरिजमध्ये प्रेम, फसवणूक, उत्तराधिकार आणि राजकारणातील अनेक पैलू दाखविण्यात येणार आहेत.

ऋचा चढ्ढासोबत या बेवसीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा दोघेही सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहेत.

या बेवसीरिजची कथा भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या वेळी वेश्या आणि त्याच्या पैशावर प्रेम करणाऱ्या ग्राहकांच्या जीवनावर आधारित आहे. या बेवसिरीजमधील अद्याप काही कलाकारांची नावे गुलदस्तात आहेत.

संजय लीला भन्साळी यांनी बेवसीरीजबद्दल बोलताना म्हटले की, ‘ही एक महाकाव्य आहे, लाहोरच्या दरबारावर आधारित पहिली बेवसीरीज आहे. मी हा प्रोजेक्ट करायला उत्साहीत आहे. मी नेटफ्लिक्ससोबत आगामी ‘हिरामंडी’ जगभरातील प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी उत्सुक आहे.’

संजय लीला भन्साळी यांनी अलिकडेच बॉलिवूडमध्ये आपली २५ वर्षे पूर्ण केली आहेत.

हेही वाचलंत का?

 

Back to top button