The Gray Man : धनुषचा पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा पोस्टर रिलीज

actor dhanush
actor dhanush
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या त्याच्या हॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. हा सुपरस्टार लवकरच 'द ग्रे मॅन' (The Gray Man ) चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी, नेटफ्लिक्सने सोमवारी चित्रपटाच्या प्रमुख चार स्टार्सच्या पोस्टर्सचे अनावरण केले. (The Gray Man )

नेटफ्लिक्सने धनुष, रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स आणि अॅना डी अरमास यांच्या पात्रांच्या पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. त्याने धनुषच्या पात्राचे वर्णन 'घातक शक्ती' असे केले. तर रायन गॉस्लिंगचे पात्र अनकॅचबल असेल. चित्रपटात ख्रिस इव्हान्स द अनस्टॉपेबल आणि अॅना डी आर्मास द अनट्रेसेबलच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे कॅरेक्टर पोस्टर रिलीज करताना नेटफ्लिक्सने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'द ग्रे मॅन' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट आऊट झाल्यामुळे आता प्रेक्षक चाहते या बहुप्रतिक्षित चित्रपटाची झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

नेटफ्लिक्सने याआधी चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लुकदेखील शेअर केला होता, ज्यामध्ये धनुष सूटमध्ये दिसला होता. नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये धनुष एका कारच्या वर दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. चित्रपटातून दिसणारा अभिनेता धनुषचा फर्स्ट लूक पाहून चाहते खूप आनंदी आणि रोमांचित झाले.

द ग्रे मॅन हा अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित अमेरिकन अॅक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स, अॅना डी आर्मास, रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब थॉर्नटन आणि वॅगनर मौरा यांच्याही भूमिका आहेत. हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे ज्याची कथा कोर्ट जेन्ट्री (रायन), एक फ्रीलान्स मारेकरी आणि माजी सीआयए ऑपरेटिव्ह यांच्याभोवती फिरते.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news