suhana khan : सुहाना बनली ग्लॅमरस डॉल | पुढारी

suhana khan : सुहाना बनली ग्लॅमरस डॉल

मुंबई :

मोस्ट ग्लॅमरस आणि गॉर्जियस स्टारकिड्सपैकी एक म्हणजे सुहाना खान. सुहाना सध्या आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुपरस्टार शाहरूख खानची कन्या असलेली सुहाना ही फॅन फॉलोईंगच्या बाबतीत जरासुद्धा कमी नाही. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ती लाखो चाहत्यांची फेव्हरिट बनली आहे.

‘द आर्चिज’ नामक चित्रपटातून सुहाना खान लवकरच अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार आहे. असे असले तरी सोशल मीडिया जगतात ती आताच एक मोठी स्टार बनली आहे. तिचा एखादा फोटो शेअर होताच तो प्रचंड वेगाने व्हायरल होत असतो. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना फारच आवडत असतो. शाहरूख खान तर स्वत: आपल्या कन्येला ‘ग्लॅमरस डॉल’ असे म्हणतो. बिकिनीपासून ते साडीतील तिचा लूक चाहत्यांना फारच आवडत असतो. यामुळेच इन्स्टाग्रामवर तिचे 2.7 मिलियन फॉलोअर्स बनले आहेत.

Back to top button