हीना खान हिचा गोल्डन कपड्यात जलवा | पुढारी

हीना खान हिचा गोल्डन कपड्यात जलवा

नवी दिल्ली : फ्रान्समध्ये सध्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ सुरू आहे. या फेस्टिव्हलची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूड कलाकारही मोठ्या संख्येनं सहभागी होऊन चाहत्यांचे मन जिंकत आहेत. या इव्हेंटमधील ज्युरी मेंबर दीपिका पदुकोन, ऐश्‍वर्या राय- बच्चनपासून ते तमन्‍ना भाटियासारख्या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवरील आपल्या वॉकने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या यादीत आता टीव्ही अभिनेत्री हीना खानही सहभागी झाली आहे. हीनाने ‘कान्स’मधील आपले फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हीना खान अत्यंत मनमोहक दिसत आहे.

हीना खानने ‘कान्स’ चित्रपट महोत्सवातील फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने गोल्डन कलरचा लाँग ड्रेस घातला आहे. या छायाचित्रात तिचा केसांचा लूकही अत्यंत आकर्षक आहे. सध्या तिची ही छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

हीना खान

हीना खान या चित्रपटाचे पोस्टर करणार लाँच

हीना खान तिच्या इंडो इंग्लिश ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ या चित्रपटाच्या पोस्टर लाँचसाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आली होती. हीना खान या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा भाग होण्याची ही दुसरी वेळ आहे. 2019 च्या सुरुवातीला ही अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग बनली होती. त्याचवेळी हीनाने यावर्षी रेड कार्पेटवर लॅव्हेंडर कलरचा ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्या रायनेही याच रंगाचा ड्रेस परिधान केला होता, त्यानंतर दोघांच्या लूकची तुलना करण्यात आली.

हीना खान

या आधी जेव्हा हीना खान या सोहळ्यात सामील झाली होती, तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील या सोहळ्यात हजर होती.  अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या सोहळ्यात सामील होणार आहे. दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये परीक्षकाची भूमिका निभवणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. यावरून दीपिका चांगलीच चर्चेत आहे. 16 ते 28 मे दरम्यान दीपिका यात व्यस्त असणार आहे.

हीना खान

फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहणार आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. तिच्यासोबत इराणी चित्रपट निर्माते असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस आणि अभिनेत्री पटकथा लेखक व निर्माती रेबेका हॉल यात सामील होतील.

Back to top button