पुढारी ऑनलाईन डेस्क
दाक्षिणात्य अभिनेत्री चेतना राजच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मल्याळम अभिनेत्री आणि ट्रान्सवूमन मॉडल शेरीन सेलिन मॅथ्यू (Sherin Selin Mathew) हिने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. शेरीन सेलिन मॅथ्यू हिने भाड्याच्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केलीय. (Sherin Selin Mathew)
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात शेरीन राहते. एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेरीन तिच्या मैत्रिणीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती. २६ वर्षीय अभिनेत्री ज्या व्यक्तीसोबत व्हिडीओ चॅट करत होती, त्या व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्यांना शेरीनच्या हालचालीची माहिती दिली. मात्र पोलिस अधिकाऱ्यांना अभिनेत्रीला वाचवता आलं नाही. कारण ते घरी पोहोचेपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. .
शेरीनच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अभिनेत्रीच्या निकटवतीर्तीयांकडे माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात ( डिप्रेशन ) होती. पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवणार आहेत. शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती मॉडेलिंगही करायची.
हेही वाचा :