पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes 2022 ) मधून पहिल्या दिवसापासून बॉलीवूडच्या अनेक सौंदर्यवतींनी वर्चस्व गाजवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर आता बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा स्टायलिश लूक समोर आला आहे. उर्वशीचे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes 2022 )च्या रेड कार्पेटवर उर्वशीने नुकतेच पदार्पण केलं आहे. यावेळी उर्वशीने पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर रफल गाऊनची निवड केली. यातील विशेष म्हणजे, रेड कार्पेटवर उर्वशी येताच चाहत्याच्या नजरा तिच्यावर खिळल्या. उर्वशी यावेळी ग्लॅमरस व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती.
पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर रफल गाऊनमध्ये उर्वशीचे सौंदर्य खुलून दिसतेय. पांढऱ्या आउटफिटवर लाल रंगाची लिपस्टिक लावून उर्वशीने तिच्या मेकअप पूर्ण केलाय. यावेळी तिने तिच्या मेकअपला ग्लोइंग बेस, काजल, आयलायनर, मस्करा आणि ब्लशरसह ग्लॅमरस टच दिला आहे. या सगळ्यासोबत तिने स्टायलिश इअर रिंग आणि ब्रेसलेटही घातल्याचे दिसतेय. यावेळी तिच्या बन हेअर स्टाईलमुळे ती आकर्षणाचा केंद्रबिदू ठरली.
उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून तिच्या लूकचे कौतुक केले आहे. यात एका चाहत्याने 'उस गुलाब को क्या गुलाब दूँ , जो खुद ही एक गुलाब है '. 'इसी दिवानगी को तो मोहब्बत कहते हैं जिसमें सब छूट जाता है. पर दिल से वो नाम नहीं..', 'परियों की शहजादी', 'Sweet baby❤️'., 'Amazing ??', 'Beauty?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण उपस्थिती लावत आहे. ग्रँड हयात कान्स हॉटेल मार्टिनेझ येथे ज्युरी सदस्यांसोबत डिनरसाठी आली असतानाचा दीपिकाचा लूक समोर आला होता. लुई वुइटनच्या फॉल २०२१ कलेक्शनमधील सीक्विन्ड ड्रेसची निवड तिने यावेळी निवड केली होती. तपकिरी रंगाचे उंच बूटदेखील तिने घातले होते.
हेही वाचलंत का?
( video : urvashirautela_arabic and urvashirautela instagram वरून साभार)