पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिला अटक झाली आहे. राज्यात सुमारे १५ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिला अटक केली आहे. तिने आपल्या फेसबूक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ज्येष्ठ राजकीय नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी, अपमान करणारा मजकूर होता. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. ठिकठिकाणावरुन निषेध व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. जवळपास १५ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?