मुंबई : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने बालपणीची मैत्रीण आणि फॅशन डिझाईनर नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधली. गर्लफ्रेंड नताशाच्या वाढदिवसादिवशी इंन्स्टावर एक फोटो शेअर करून वरुण धवनने आपल्या अफेअरचा खूलासा केला होता. यानंतर मुंबईतील अलिबाग येथे दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर वरुण आणि नताशा हनीमूनसाठी तुर्कीला गेले आहेत. तिथून परत आल्यानंतर दोघेही जुहूमधील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला जाणार आहेत. पण मात्र, वरुण धवनची संपत्ती किती आहे हे आपणास माहिती आहे का?. तर जाणून घेवूयात…
'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुणकडे जगातील श्रीमंत व्यक्तींच्याकडे असणाऱ्या पाच महागड्या वस्तु आहेत. यात जुहूमध्ये २० कोटींचा आलिशान बंगला, ८८ लाखांची मर्सिडीज, ऑडी क्यू ७ कार, रॉयल एनफील्ड बुलेट आणि पोलारिस स्पोर्ट्स बाइक यासारख्या गाड्याचा मालक वरुण धवल आहे.
वरुण धवनकडे मुंबईतील जुहूमध्ये एक आलिशान अपार्टमेंट आहे. हा बंगला २०१७ मध्ये त्याने खरेदी केला आहे. वरुणच्या आलिशान अपार्टमेंटला सध्या मनमोहक सजावट केली आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रशस्त लिव्हिंग रूमसोबत एक जिम देखील आहे. वरुण धवन अनेक वेळा सोशल मीडियावर या जिमचे फोटो शेअर करत असतो. अहवालानुसार, वरुणच्या अपार्टमेंटची वास्तविक किंमत सुमारे २० कोटींच्या घरात आहे.
अधिक वाचा : बेबी बंपसोबत करिना कपूरने केला योगा (Viral Video)
यासोबतच वरुण धवलकडे मर्सिडीज, कार, बुलेट आणि स्पोर्ट्स बाइक देखील आहे. वरुणकडे असणाऱ्या मर्सिडीज बेंझ कारची किमंत ८८ लाख रुपये आहेत. या मर्सिडीज कारमधून वरुण वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाला आहे. वरुणकडे ८५ लाख रूपयांची ऑडी क्यू -७ ही देखील कार आहे. ही कार खूपच वेगवान असून अरामदायी आहे. याशिवाय वरुणकडे एक रॉयल एनफील्ड बुलेट असून यांची किमंत १.८ लाख ते ३. ७ लाखांच्या घरात आहे. त्याच्याकडे पोलारिस स्पोर्ट्स बाईक देखील आहे. या बाईकची किमंत ३ लाख ते ३० लाखांच्या घरात आहे. यावरून असे दिसते की, वरुण धवन हा कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.