'तांडव'च्या वादाचा 'फॅमेली मॅन २' ला फटका | पुढारी

'तांडव'च्या वादाचा 'फॅमेली मॅन २' ला फटका

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या मिर्झापूर आणि तांडव या दोन वेबसिरीजवर मोठा दंगा झाल्यानंतर आता कंपनीने त्यांची तिसरी मोठी वेबसिरीज द फॅमेली मॅन २ ची रिलिज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. द फॅमेली मॅन २ ही वेबसिरीज फेब्रुवारी १२ पासून प्राईवर प्रदर्शित होणार होती. याचा ट्रेलर १९ जानेवारीलाच प्रदर्शित झाला होता. ( Tandav controversy amazon prime video decided to The Family Man season 2 postpone )

या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या एका आतल्या सुत्रांने या माहितीला पुष्टी दिली आहे. ‘हे खरे आहे, फॅमेली मॅन २ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ही मनोज वाजपेयी आणि सहाय्यक दिग्दर्शक राज, डिके यांच्यासाठी मोठी निराशा आहे. वेबसिरीज पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे अमेझॉनच्या दोन यशस्वी मिर्झापूर आणि तांडव या मालिका भावना दुखवल्यामुळे अंडर स्कॅनर आहेत. त्यामुळे अमेझॉन आपली सर्वात प्रसिद्ध वेबसिरीज द फॅमेली मॅनचा पुढचा हंगाम रिलीज करण्यासाठी हे वातावरण अनुकूल नाही असे मानते.’ असे कारण या सुत्राने दिले. 

माधुरीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते म्हणाले, धक धक करने लगा! (photos)

मात्र सुत्रांना द फॅमेली मॅनबाबत कोणताही वाद पूर्वी नव्हता असे विचारले असता त्याने ‘हे मला माहित आहे. हे तुम्हाला माहित आहे. पण, कोणत्या गोष्टीवर लोकांची प्रतिक्रिया प्रतिकूल येऊ शकते हे कोणाला ठाऊक आहे? त्यामुळे अमेझॉनने त्यांची द फॅमेली मॅन सारखी महत्वाची वेबसिरीज योग्य वेळ येईपर्यंत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे उत्तर दिले. 

पतीच्या स्वप्नामुळे पत्नीला लागला तब्बल ३४० कोटी रुपयांचा जॅकपॉट!

याचबरोबर सुत्राने वेबसिरीज पुढे ढकलण्यात सह दिग्दर्शक राज निधिमोरु आणि कृष्णा डिके यांचा काही संबंध नाही असे सांगितले. सुत्राने सांगितले की, या दोघांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी द फॅमेली मॅनचा दुसरा हंगाम पूर्ण केला आहे. सिरीज प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे. त्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही कारण त्यात आक्षेपार्ह वाटू शकतो असा कोणताही भाग नाही.

Back to top button