माधुरी झाली 55 वर्षांची! | पुढारी

माधुरी झाली 55 वर्षांची!

पुढारी ऑनलाईन डेस्क

वाटतं का खरं? माधुरी दीक्षित-नेने आता 55 वर्षांची झाली आहे! रेखाप्रमाणेच माधुरीबाबतही आता वय म्हणजे निव्वळ एक आकडाच बनून राहिलेला आहे. या वयातही माधुरीचे सौंदर्य, तिचा चार्म, तिची जादू अबाधित आहे. सोमवारी तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. मात्र, तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्या शुभेच्छा खासच होत्या. त्यांनी लिहिले, ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझी पत्नी, बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझे तुझ्यावर निरातिशय प्रेम आहे आणि जगातील सर्वोत्तम गोष्टीच तुझ्यासाठी आहेत. येणारी सर्व वर्षे तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी आनंदाचीच असोत!’ माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचे 1999 मध्ये लग्‍न झाले होते.

Back to top button