अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोना | पुढारी

अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोना

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आता दुसर्‍यांदा कोरोना संक्रमित झाला आहे. त्याने स्वतःच ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे तो आता कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकणार नाही. तो केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारतीय शिष्टमंडळातील एक सदस्य म्हणून या महोत्सवात सहभागी होणार होता. त्याने ट्विट करून म्हटले आहे की ‘कान्सच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक होतो. मात्र, दुर्दैवाने माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे आता मी विश्रांती घेईन. अनुराग ठाकूर, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!’ अक्षय कुमारला दुसर्‍यांदा कोरोना!

Back to top button