संजय कपूरच्या मुलीच्या बेली डान्समध्ये मनमोहक अदा! (video) | पुढारी

संजय कपूरच्या मुलीच्या बेली डान्समध्ये मनमोहक अदा! (video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये शनाया एकाच गाण्यावर दोन वेगवेगळ्या पध्दतीने नृत्‍य करत असल्‍याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये शनाया एकटीच नृत्‍य करताना दिसते, तर दुसऱ्यावेळी त्‍याच गाण्यावर कोरीओग्राफर सोबत ती नृत्‍य करताना दिसून येते. शनायाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्‍याला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. 

अधिक वाचा : फक्त ९४ रुपयात गॅस मिळवण्याची आज शेवटची संधी! काय आहे जबरा ऑफर?

शनाया कपूरने आपल्‍या इंन्स्‍टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तीने एक गाणे दोन वेगवेगळ्या स्‍टाईल मध्ये असे लिहिले आहे. या व्हिडिओ मध्ये शनाया ब्‍लॅक आउटफिट मध्ये बेली डान्स करत असल्‍याचे दिसून येत आहे. नंतर ती डान्स ट्रेनर यश कदम सोबत गाण्याच्या बीट्सवर थीरकताना दिसत आहे.

अधिक वाचा : मराठा आरक्षणासाठी आज सह्याद्री अतिथिगृहावर बैठक

शनाया कपूर अजूनही चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच ॲक्‍टीव्ह असते. ती नेहमी आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तुमच्या माहितीसाठी शनायाने जान्हवी कपूर च्या ‘गुंजन सक्‍सेना द कारगिल गर्ल’ मध्ये असिस्‍टंट डायरेक्‍टर म्‍हणून काम केले आहे. ती ज्‍या पध्दतीने सोशल मीडियातून आपले चाहते वाढवत आहे. ते पाहता ती येणाऱ्या काळात चित्रपटात दिसू शकते. 

Back to top button