माझा चित्रपट अजय प्रमोट करणार नाही | पुढारी

माझा चित्रपट अजय प्रमोट करणार नाही

नवी दिल्ली :

कंगना राणावत सध्या आपल्या ‘धाकड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या 20 मे रोजी प्रदर्शित होत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा आपला चित्रपट कधीच प्रमोट करणार नाही, असे म्हटले आहे.

कंगनाने म्हटले आहे की, अजय देवगण दुसर्‍या चित्रपटांचे प्रमोशन करेल; पण माझ्या नाही. ‘थलाईवी’ या चित्रपटावेळी अक्षय कुमारने मला फोन करून सांगितले की, तुझा चित्रपट फारच चांगला वाटला; पण त्याने या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला नाही. ‘गंगुबाई काठियावाडी’ यासारख्या फिमेल सेंट्रिक चित्रपटात अजय काम करू शकतो. तर माझ्या चित्रपटात अशी तो भूमिका करेल काय? जर त्याने असे केले तर त्याची मी नेहमीच आभारी राहीन.

Back to top button