महिलांना पहिल्‍यांदा सिनेमात घेणारे दादासाहेब फाळके | पुढारी

महिलांना पहिल्‍यांदा सिनेमात घेणारे दादासाहेब फाळके

पुढारी ऑनलाईन डेस्क 

धुंडीराज गोविंद फाळके यांना दादासाहेब फाळके नावाने ओळखले जाते. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमा जगतात महत्त्‍वाचे योगदान दिले आहे. आज ३० एप्रिल रोजी त्यांचा जन्मदिवस. त्या औचित्याने जाणून घेऊया या खास गोष्‍टी. 

देशातील एक महान निर्माते, दिग्‍दर्शक म्‍हणून त्‍यांची ख्‍याती. त्‍यांनी भारतीय सिनेमा जगतात दिल्‍या अमूल्‍य योगदानामुळे त्‍यांना ‘भारतीय सिनेमाचे पितामह’ असे म्‍हटले जाते. 

दादासाहेब फाळके यांचा जन्म महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरमध्‍ये ३० एप्रिल, १८७० रोजी झाला होता. बालपणापासूनच त्‍यांना कलेत रुची होती. दादा साहेब यांनी १८५५ मध्‍ये मुंबईच्‍या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्‍ये प्रवेश घेतला होता. येथे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर ते बडोदाच्‍या कला भवनमध्‍ये प्रवेश घेतला. येथे त्‍यांनी मूर्तीशिल्प, इंजिनिअरिंग, पेंटिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. 

फाळके यांनी फोटोग्राफर म्‍हणून आपल्‍या करिअरला सुरुवात केली. त्‍यांनी प्रसिध्‍द चित्रकार राजा रवी वर्मा यांच्‍यासोबतही काम केले. इतकेच नाही तर एका जर्मन जादूगरचा मेकअपदेखील फाळके करत होते. त्‍यांनी प्रिंटिंग प्रेसच्‍या बिझनेसमध्‍येही हात आजमवला. ते प्रिटींग टेक्‍नॉलॉजी शिकण्‍यासाठी जर्मनी गेले. तेथे त्‍यांनी टेक्नॉलॉजी आाणि कलेबद्‍दल शिक्षण घेतले. १९०९ मध्‍ये त्‍यांनी जर्मनी जाऊन सिनेमाविषयी माहिती घेतली. 

भारतात मोशन पिक्चरची सुरुवात करण्‍याचा त्‍यांनी निर्णय घेतला. १९१२ मध्‍ये ते लंडन गेले. तेथे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थकडून चित्रपटाविषयी माहिती घेतली. जेव्‍हा ते इंग्लंडहून परतले, त्‍यावेळी त्‍यांच्‍यासोबत एक कॅमेरा, एक प्रिंटिंग मशीन होतं. 

दादासाहेब यांनी १९१० मध्‍ये ‘लाईफ ऑफ क्राईस्ट’ पाहिला. हा चित्रपट पाहिल्‍यानंतर दादासाहेब यांच्‍या मनात विचार आला की, यातच काम करावे. त्‍यांनी १९१२ मध्‍ये पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनवला. हा मूकपट होता. हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. हा चित्रपट बनवण्‍यासाठी त्‍यावेळी १५ हजार रुपयांचा खर्च आला होता. 

त्‍याकाळात, चित्रपटात महिलांच्‍या भूमिका नसायच्‍या. महिलांची भूमिका पुरुष कलाकाराच साकारायचे. असे म्‍हटले जाते की, दादासाहेबांनी आपल्‍या चित्रपटात महिलांना संधी दिली. त्‍यांनी आणलेला भस्मासुर मोहिनी या चित्रपटात त्‍यांनी दोन महिलांना संधी दिली. त्‍या महिला होत्‍या – दुर्गा आणि कमला. १८९९ मध्‍ये जन्मलेल्‍या दुर्गाबाई कामत भारतीय सिनेमाच्‍या पहिल्‍या महिला अभिनेत्री होत्‍या. दादासाहेब फाळके यांनी दुर्गा यांना पार्वतीच्‍या भूमिकेसाठी घेतले. तर कमलाबाई गोखले यांनी बालकलाकार म्‍हणून मोहिनीची भूमिका केली.  

चित्रपट प्रवास 

राजा हरिश्चंद्रच्‍या यशानंतर दादासाहेब फाळके यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक बिझनेसमनसोबत मिळून त्‍यांनी दादासाहेब फाळके चित्रपट  कंपनी बनवली होती. कंपनीचे नाव होते हिंदुस्तान फिल्म्स. ती देशाची पहिली चित्रपट कंपनी होती. त्‍यांनी एक मॉडल स्टुडिओ बनवले. ते अभिनेत्‍यांबरोबरच टेक्निशन्‍सनाही ट्रेनिंग देऊ लागले. अनेक अडचणी आल्‍यानंतर ते १९२० मध्‍ये हिंदुस्तान फिल्म्समधून बाहेर पडले. त्‍यांनी राजीनामा दिला. त्‍यांनी सिनेमा जगतातूनही बाहेर पडायचे ठरवले. त्‍यावेळी चित्रपट कंपनी तोट्‍यात गेली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या कंपनीतील इतर सदस्‍यांनी दादासाहेबांना पुन्‍हा कंपनी जॉईन करण्‍यास सांगितले. सदस्‍यांच्‍या आग्रहास्‍तव दादसाहेबांनी पुन्‍हा कंपनी जॉईन केली. 

दादा साहेबांनी २५ वर्षात जवळपास १०० चित्रपट बनवले. तर २६ लघुपट बनवले.  मोहिनी भस्मासूर (१९१३), सत्यवान सावित्री (१९१४), लंका दहन (१९१७), श्री कृष्ण जन्म (१९१८) आणि कालिया मर्दन (१९१९) या चित्रपटांचा समावेश आहे. 

दादासाहेब फाळके पुरस्कार

त्‍यांच्‍या सन्‍मानार्थ भारत सरकारने १९६९ मध्‍ये ‘दादासाहब फाळके ॲवॉर्ड’ देण्‍यास सुरुवात केली. हा भारतीय सिनेमा जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. सर्वात प्रथम हा पुरस्‍कार मिळवणारी महिला देविका राणी चौधरी होत्‍या. १९७१ मध्‍ये दादासाहेब फाळके यांच्‍या सन्‍मानार्थ एक टपाल तिकिट जारी केले होते. त्‍यावर दादासाहेबांचे चित्र होते. 

Back to top button