‘टार्झन’ फेम अभिनेत्‍याचा विमान अपघातात मृत्यू  | पुढारी

'टार्झन' फेम अभिनेत्‍याचा विमान अपघातात मृत्यू 

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत टेनेसी येथील विमान अपघातात ‘टार्झन’ फेम अभिनेता जो लारा यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी घडली होती. मृत्यू झालेल्यांमध्ये जो लारा यांच्या पत्नीचाही समावेश आहे. लारा यांनी नव्वदच्या दशकात टीव्ही मालिका ‘टार्झन’ मालिकेमध्ये अभिनय केला होता.  

वाचा – ‘मस्तानी’ होऊन राखी निघाली पतीच्या शोधात (Video)

काउंटी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सात जण ब्रँडन हन्ना, ग्वेन एस लारा, विल्यम जे लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स अशी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून पुष्टी झाल्यानंतर त्यांची नावे जाहीर करण्यात आली. हे सर्वजण टेनेसीतील ब्रेंटवुडचे रहिवासी होते. जो लारा यांनी टीव्ही मालिका ‘टार्जन: द एपिक एडव्हेंचर्स’मध्ये टार्जनची भूमिका साकारली होती. त्यांची पत्नी ग्वेन एस लारादेखील विमानात होती. 

वाचा- शेरॉन स्टोन Basic Instinct : ‘त्या’ सीनसाठी अंडरवेअर काढली, पण दिग्दर्शनकाने शब्द फिरवला

जो लारा यांची पत्नी ग्वेन एस लारा (ग्वेन शम्बलिन लारा) यांनी १९९९ मध्ये ब्रेंटवुडमध्ये रेमनेंट फेलोशिप चर्चची स्थापना केली होती. द फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दुर्घटनेवेळी हे सी 501 विमान स्मिर्ना रुदरफोर्ड काउंटी विमानतळाजवळून पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. स्मिर्ना नॅशविलेच्या ३२ किलोमीटर अंतरावर आहे. पर्सी प्रीस्ट एक सरोवर असून हे ठिकाण बोटिंग आणि मासेमारीसाठी प्रसिध्द आहे. 

 

Back to top button