'देवमाणूस' फेम नेहा खानचा हॉट लूक, फोटोंची होतेय चर्चा  (Photos) | पुढारी

'देवमाणूस' फेम नेहा खानचा हॉट लूक, फोटोंची होतेय चर्चा  (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘देवमाणूस’ या मराठी मालिकेत एसीपी दिव्या सिंहची भूमिका अभिनेत्री नेहा खानने साकारली आहे. तिची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला. देवी सिंग उर्फ डॉ. अजित कुमार देवचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दिव्याने कंबर कसली आहे. अल्पावधीत दिव्याने या मालिकेतून लोकप्रियता मिळवली. ग्लॅमरस असणारी नेहा खान रिअल लाईफमध्येही खूप सुंदर आहे. ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मॉडेल ते अभिनेत्री असा नेहा खानचा प्रवास संघर्षमय आहे.  

May be an image of 1 person, standing, motorcycle and outdoors

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person, long hair, standing and brick wall

अभिनेत्री नेहा खानने संघर्षातून इथेपर्यंत मजल मारली आहे. नेहाच्या आई-वडिलांनी लव्ह मॅरेज केल्यामुळे त्यांच्या दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारलं नाही. नेहाच्या आईची परिस्थिती बेताची होती. नेहाच्या आईला संपत्ती मिळू नये, म्हणून काही गुंडांनी त्यांना मारहाण केली होती. यामध्ये तिच्या आईला शरिरावर ३७० टाके पडले होते. 

May be an image of 1 person, standing, tree and outdoors

May be an image of 1 person

नेहा आपल्या सौंदर्याविषयी सांगते, आमच्या शेजारच्या काकू एक दिवस मला फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या. फोटोग्राफरने माझे काही फोटो काढले आणि मला विचारलं की, तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का? माझ्या घरात आरसा नव्हता. त्यावेळी मला माझ्या सौंदर्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पण, फोटोखाली आपलं खान आडनाव दिलं, तर पुन्हा माझ्या वडिलांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील, अशी भीती मला वाटली. त्यामुळे मी नेहा महल्ले असं आईचं आडनाव दिलं. तो फोटो माझ्या परिचित लोकांनी पाहिला आणि मला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person, standing, brick wall and outdoors

नेहा आपल्या संघर्षमय जीवनातील आणखी एक किस्सा सांगते- नेहा खान मूळची अमरावतीची आहे. मुंबईत ऑडिशनला येताना वडिलांना समजू नये म्हणून ती छोटी बॅग सोबत आणायची. फेसबुकवर ओळख झालेल्या ऑडिशन घेणार्‍या लोकांना ती भेटायची. कधी रेल्वे चुकली तर पेपर टाकून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर झोपायची. असा संघर्ष दोन-तीन वर्ष करावा लागला होता. 

May be an image of 1 person, standing, flower and outdoors

May be an image of 1 person, standing and outdoors

असा मिळाला पहिला सिनेमा 

नेहा म्हणते-किशोरी शहाणे, सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी मदत केली. पुढे ‘U वा’ (२०१५) हा जिमी शेरगिलसोबत पहिला चित्रपट तिला मिळाला. 

May be an image of 2 people, people standing and outdoors

May be an image of 1 person, standing and outdoors

तिने मराठीसोबतचं हिंदी आणि मल्याळम चित्रपटदेखील केले आहेत. तिने शिकारी, बॅड गर्ल (२०१५), घायल वन्स अगेन (२०१६), गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स (२०१७), काळे धंदे, हाफ ट्रुथ (२०१७) यांसारखे चित्रपट केले आहेत. पण, आता देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव प्रेक्षकांच्या तोंडी आहे.

May be an image of 1 person, standing, flower and outdoors

May be an image of 1 person, standing and outdoors

शिकारी चित्रपटात बोल्डनेसचा तडका 

शिकारी या चित्रपटामध्ये नेहाने बोल्डनेसचा तडका लावलेला दिसतो. तिच्या प्रत्येक अदांनी प्रेक्षकांवर भूरळ घातली होती.

May be an image of 1 person, standing and outdoors

नेहाने मध्यंतरी युवा डान्सिंग शोमध्ये बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. तिच्या डान्सने सर्वचं जण अवाक झाले होते.

May be an image of 1 person, sitting and indoor

तिला टीव्ही पाहायला, संगीत ऐकायला आवडते. 

May be an image of 1 person and jewellery

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person

May be an image of 1 person, standing and indoor

May be an image of 1 person, standing and jewellery

Back to top button