दिशा आणि टायगर रस्त्यावर 'मलंग', पोलिस म्हणतात 'हिरोपंती' नको | पुढारी

दिशा आणि टायगर रस्त्यावर 'मलंग', पोलिस म्हणतात 'हिरोपंती' नको

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यात कोरोना विषाणूविरूद्ध लढा सुरू आहे. वांद्रेच्या रस्त्यावर ‘मलंग’ दोन कलाकारांना फिरणे महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात भा.दं. वि ३४ अंतर्गत कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे ट्विट मुंबई पोलिसांनी ट्विटरवर शेअर केली आहे. MumbaiPolice या त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट करण्यात आले आहे. याचबरोबर पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, ‘रस्त्यावर अनावश्यक हिरोपंती बंद करा.’ 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना उद्देशून हे ट्विट करण्यात आले आहे. ट्विटमध्ये या दोघांची नावे नाहीत. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाचा – दिशा पटानी आणि टायगर श्रॉफला पोलिसांचा दणका! मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले की, मुंबईत दुपारी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही कारणाशिवाय फिरण्यास बंदी आहे; परंतु टायगर श्रॉफ वांद्रे बसस्थानकाजवळ सायंकाळपर्यंत फिरताना आढळले. त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टायगर आणि दिशा ड्राईव्हवर बाहेर आले होते. त्यांचे काही फोटो समोर आली होती. हे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी टायगर आणि दिशाला पोलिसांनी रोखून चौकशी केली होती. 

मीडिया रिपोर्टनुसार टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी वांद्रे येथील जिम सेशननंतर ड्राईव्हवर गेले होते. वांद्रेच्या बॅन्डस्टँडकडे जाण्याच्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले. यादरम्यान दिशा पाटनी कारच्या पुढच्या सीटवर बसली होती आणि टायगर मागील सीटवर बसला होता. पोलिसांनी त्यांचे आधार कार्ड, परवाना व इतर कागदपत्रे तपासली. 

 

Back to top button