'अंजली गायकवाडला इंडियन आयडलमध्ये परत घ्या' | पुढारी

'अंजली गायकवाडला इंडियन आयडलमध्ये परत घ्या'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : इंडियन आयडल १२ सध्या चर्चेत आहे. कारण, स्पर्धक अंजली गायकवाडला या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अंजलीला पुन्हा शोमध्ये घेण्याची मागणी होत आहे. 

इंडियन आयडल १२ मध्ये प्रेक्षकांनी मागील एपिसोडमध्ये अंजली गायकवाडचे एलिमिनेशन पाहिलं. कमी मते मिळाल्याने तिला शोमधून बाहेर करण्यात आले. अंजली गायकवाडशिवाय सायली कांबळे आणि सवाई भाट डेंजर झोनमध्ये होते. पण, शेवटी अंजलीवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती.अखेर, तिला शोमधून बाहेर जावे लागल्याने सोशल मीडियावर युजर्स तिला परत शोमध्ये घेण्याची मागणी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर होऊ लागली. 

अंजली गायकवाड सातवी स्पर्धक होता, जी नचिकेत लेलेनंतर शोतून बाहेर झाली. इंडियन आयडल १२ मध्ये ८ स्पर्धक उरले आहेत. 

नेटकऱ्यांकडून परीक्षकांवर आरोप 

चाहते, नेटकऱ्यांनी शोचे निर्माते आणि परीक्षकांवर संताप व्यक्त केला आहे. स्पर्धकांची प्रतिभा न ओळखण्याचा आरोप केला आहे. अनेक जणांनी अनु मलिक यांना परीक्षकांच्या पॅनेलमधून हटवण्याची मागणीदेखील केली आहे. अंजलीने गायलेले प्रत्येक गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. अंजलीने आपल्या मधुर आवाजाने शोमध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. अंजलीच्या एलिमिनेशननंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

May be a Twitter screenshot of text that says "Tweet Shyam Vadalker @st_vadalkar 22h #AnjaliGaikWad Elimination of Anjali Gaikwad is unbelievable. It indicates the favoritism is rampant in Indian Idol 12.I am of strong opinion that system of public voting should be scrapped and the contestants should be judged only by the judges to give justice to contestants 3 3 10"

एका युजरने ट्विटरवर कमेंट केली आहे की, ‘जेव्हा शनमुख प्रिया गाते , तेव्हा मी टीव्ही म्यूट करते. मी जुनी गाणी आणि इतके सुंदर सूर वाईट पध्दतीने गाताना पाहू शकत नाही. सॉरी. तुम्हाला खरंच वाटते की, शनमुख प्रिया ही अंजलीपेक्षा सरस आहे. प्लीज चॅनलवालो तिला परत आणा.’

May be a Twitter screenshot of text that says "Sujata Baban Chavan @sujataMSETCL Replying to @st_vadalkar If #AnGakWac dont bring TRP how weeter is flooded after her elimination 12:58 PM Jun 7, 2021 Twitter Web App 3 Likes"

अजय माकन यांनी अंजलीला केलं समर्थन 

अंजलीच्या एलिमेशननंतर काँग्रेस नेते अजय माकन यांनीदेखील ट्विट करून तिला शोमध्ये परत आणण्याचे आवाहन केले. तिने लिहिलं की, ‘ही खूप कठीण वेऴ आहे. प्रत्येक फोन कॉल आणि सोशल मीडियावर प्रत्येक पोस्ट धक्कादायक आहे. काय होईल, माहिती नाही. काही तासात संगीत आपल्यालाला जुन्या काळात घेऊन जातो. यातील कुठलाही स्पर्धक एलिमिनेशन डिजर्व्ह करत नाही. #AnjaliGaikwad ला परत आणा.’

 

Back to top button