‘वकील मॅडम’ होणार का देवी सिंगची शिकार! | पुढारी

‘वकील मॅडम’ होणार का देवी सिंगची शिकार!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. कथानकातील खतरनाक ट्विस्ट हे मालिकेची युएसपी आहे. कथानकातील देवमाणूस डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याचं पुढे काय होणार तो सुटणार की त्याला शिक्षा होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. एसीपी दिव्या सिंगने तर भर लग्नाच्या मांडवातून डॉक्टर उर्फ देवी सिंगला चोप देत वरात काढली. 

पोलिसांनी अटक केल्यानंतर आता देविसिंगला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. तो कोर्टात स्वतःची बाजू स्वतःच मांडतोय. दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टातच सादर करणार आहे. अशात आता मालिकेत देवीसिंगला तुरुंगात धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. आर्याची एन्ट्री होताच देविसिंग तिच्याकडे आकर्षीत होतो. अभिनेत्री सोनाली पाटील ही सरकारी वकीलाची भूमिका साकारतेय. 

सोनाली पाटील ही मुळची कोल्हापूरची आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिनं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. ते करत असतानाच सोनालीला ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

सोनाली आता देवमाणूस मालिकेत वकीलाची भूमिका कशी साकारणार या कडे सर्वांचं लक्ष लागूलंय. दरम्यान, सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’ 

‘वैजू नं 1’ या मालिकेत सोनालीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘घाडगे अँड सून’, ‘देव पावला’ अशा मालिकांमध्ये झळकली. तिचा टिकटॉकवरही मोठा चाहता वर्ग होता. 

आता देवमानूस मालिकेत सोनाली म्हणजेच सरकारी वकील आर्या देशमुख देवी सिंगला खडी फोडायला पाठवणार आहे आणि त्यासाठी कोर्टात त्याच्यासोबत वादविवाद करताना दिसेल. ती देवी सिंगला शिक्षा करून देण्यात यशस्वी होईल की ती देखील देवी सिंगची शिकार होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Back to top button