उर्वशी रौतेलाला 'त्याने' पोटावर मारले दे दणादण पंच! (Video) | पुढारी

उर्वशी रौतेलाला 'त्याने' पोटावर मारले दे दणादण पंच! (Video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीचं आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती नेहमी ॲक्टिव्ह राहते. ती कधी चित्रपटांमध्ये तर कधी म्युझिक व्हिडिओ वा डान्स व्हिडिओच्या माध्यमातून फॅन्सच्या भेटीला येत असते. उर्वशी रौतेला आता धुमाकूळ घालायला येत आहे. उर्वशीने आणखी एक व्हिडिओ आता शेअर केला आहे. यामध्ये ती बॉक्सिंग रिंगमध्ये दिसत आहे. यादरम्यान, एक व्यक्ती तिला पोटामध्ये पंच मारताना दिसत आहे. तो तिला पोटावर इतके पंच मारतो की, उर्वशी ते सहन करते. पण, जेव्हा तिला हा पंच सहन होत नाही, तेव्हा ती दमते. तिचा हाहा  हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

वाचा- विक्‍की कौशलने कॅटरीनाला सलमानसमोर केलं होतं प्रपोज, अशी झाली लव्ह स्टोरीची सुरुवात

उर्वशीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ४ तासात ३ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलं होतं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, ‘नो पेन नो गेन.’ उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओवर फॅन्स नेहमीप्रमाणे खूप रिॲक्शन देत आहेत. उर्वशी रौतेलाचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोइंग आहे. तिला इन्स्टाग्रामवर ३८ मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. 

उर्वशी रौतेलाचा ‘डूब गए’ गाणे रिलीज झाले होते. ती ‘द ब्लॅक रोज’, ‘थ्रितुत्तु पयाले २’ आणि वेब सीरीज ‘इन्स्पेक्टर अविनाश’चा समावेश आहे. त्याशिवाय ती इजिप्तचे प्रसिध्द गायक मोहम्मद रमदानसोबत म्युझिक अल्बम ‘वर्साचे’मध्येदेखील दिसणार आहे. याआधी तिचा चित्रपट ‘वर्जिन भानुप्रिया’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. 

Back to top button