'ससुराल सिमर का २' : बडी व छोटी सिमरचा खास परफॉर्मन्स  | पुढारी

'ससुराल सिमर का २' : बडी व छोटी सिमरचा खास परफॉर्मन्स 

मुंबई;  पुढारी ऑनलाईन : कलर्सवरील मालिका ‘ससुराल सिमर का २’ची धमाक्‍यात सुरूवात झाली आणि आता मालिकेमध्‍ये सेलिब्रेशनचा उत्‍साह आहे. बडी सिमरचा सून शोधण्‍याचा प्रवास रीमाजवळ (तान्‍या शर्मा) येऊन थांबला आहे आणि तिचा आरवसोबत (अविनाश मुखर्जी) विवाह होणार आहे. विवाह सोहळ्यामध्‍ये अनेक परफॉर्मन्‍स व प्रथा पाहायला मिळणार आहेत. तसेच बडी व छोटी सिमर एकमेकींसोबत नृत्‍य करताना देखील पाहायला मिळणार आहेत. दोघीही जांभळ्या रंगाच्‍या पोशाखामध्‍ये मोहक दिसतात आणि मालिकेच्‍या शीर्षक गाण्‍यावर नृत्‍य सादर करतात. 

छोटी सिमरची भूमिका साकारणारी राधिका मुथूकुमार म्‍हणाली,”मी दीपिकासोबत नृत्‍य करणार असल्याचे समजल्‍यानंतर आश्‍चर्यचकित व आनंद झाला. आम्‍ही सीनबाबत चर्चा केली आणि आम्‍ही मॅचिंग रंगाचे पोशाख परिधान करण्‍याचे ठरवले. मला माहित होते की दीपिका उत्तम नर्तिका आहे आणि तिच्‍यासोबत नृत्‍य करण्‍याचे निश्चितच आव्‍हान होते. पण, ती खूपच चांगली आहे आणि आम्‍ही दोघींनी या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना खूप धमाल केली.”

छोटी सिमर व बडी सिमरचा अद्भुत परफॉर्मन्‍स पाहण्‍यासाठी पाहा ‘ससुराल सिमर का २’ दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता फक्‍त कलर्सवर.

Back to top button