माझ्या आईने 'तिला' दाजीसोबत रंगेहाथ पकडले होते! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा सनसनाटी खुलासा  | पुढारी

माझ्या आईने 'तिला' दाजीसोबत रंगेहाथ पकडले होते! शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचा सनसनाटी खुलासा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने पहिल्यांदाच पहिली पत्नी कविताविषयी एक दीर्घ मुलाखत दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून कविता राज कुंद्राच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे शिल्पा शेट्टीवर विविध आरोप केले  आहेत आणि म्हणूनच राज कुंद्रने स्वत: समोर येऊन खुलासा केला आहे. या दीर्घ मुलाखतीत राज कुंद्राने बरेच सनसनाटी खुलासे केले आहेत. 

अधिक वाचा : श्रुती मराठेचा कातिलाना अंदाज (Photos)

आईने तिला रंगेहाथ पकडले

ईटाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत राज म्हणाला की, “या विषयावर अनेक वर्षांनी बोलत दडपण दुर झाले आहे कारण मी सत्य बोलत आहे. कविता आता याबद्दल काय म्हणते याची मला पर्वा नाही. माझ्या आईने माझी पहिली पत्नी कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा रंगेहाथ पकडले होते. येथे २ कुटुंबे उद्ध्वस्त होत होती आणि त्यांनी त्याबद्दल विचार केलाही नाही.

अधिक वाचा : उर्वशी रौतेलाला ‘त्याने’ पोटावर मारले दे दणादण पंच! (Video)

घटस्फोटानंतर कविताशी कधीही बोललो नाही

घटस्फोटानंतर पहिली पत्नी कविताबाबत बोलताना राज कुंद्रा म्हणाला की, मी कविताशी कधी बोललो नाही, मला नको आहे. मी माझ्या मुलीला भेटण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण कविताच्या कुटूंबाने हे कधीही होऊ दिले नाही. मला माहित आहे की जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा माझी मुलगी माझ्याकडे येईल. मी फक्त ४० दिवस माझी मुलगी पाहिली आहे. त्यानंतर शिल्पाशी लग्न करून मी भारतात आलो. माझ्या मुलीला मी भेटायला नको अशी कविताची इच्छा होती आणि त्यावेळी कोर्टानेही कविताच्या बाजूने निकाल दिला.

अधिक वाचा : लग्नच वैध नाही, मग घटस्फोट कसला? नुसरत जहाँने लग्नाचे फोटो टोटल डिलीट मारले!

मी कधीच कविताला माफ करणार नाही

राज पुढे म्हणाला की, ‘जेव्हा मी शिल्पाला व्हायरल झालेले जुने लेख पाठविले, तेव्हा तिने मला याबद्दल बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती. हे लेख विशेषतः तिच्या वाढदिनी व्हायरल झाले आणि यामुळे मला धक्का बसला. कविताने माझा विश्वासघात केला, ठीक आहे, परंतु ज्या प्रकारे दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली त्याबद्दल मी त्यांना कधीही क्षमा करू शकत नाही. शिल्पा माझ्या मुलाखतीमुळे नाराज आहे पण सत्य कोठेतरी तरी समोर येणारचं होतं.

Back to top button