मिथून चक्रवर्ती : नक्षलवादी ते अभिनेता… | पुढारी

मिथून चक्रवर्ती : नक्षलवादी ते अभिनेता...

पुढारी ऑनलाईन : आय एम ए डिस्को डान्सर हे गाणं ऐकलं की आठवतो  तो मिथून चक्रवर्ती. वारदात, अविनाश, जाल, डिस्को डान्सर, भ्रष्टाचार, घर एक मंदिर, वतन के रखवाले, हमसे बढकर कौन, चरणों की सौगंध, हमसे है जमाना, बॉक्सर, बाजी, कसम पैदा करने वाले की, प्यार झुकता नहीं, करिश्मा कुदरत का, स्वर्ग से सुंदर यासारख्या ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले मिथूनदा म्हणजेच मिथून चक्रवर्ती त्यांचा आज १६ जून रोजी वाढदिवस आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की, मिथून हे चित्रपटात येण्यापूर्वी नक्षलवादी होते. एका नक्षलवाद्याचा बॉलिवूडच्या अभिनेत्यापर्यंतचा प्रवास कसा होता, हे जाणून घेऊया.

१९९३ ते १९९८ चा काळ. या काळात मिथून यांचे  चित्रपट सटकून आपटत होते. यावेळी त्यांचे एकूण ३३ चित्रपट फ्लॉप ठरले. तरीही त्यांचं स्टारडम कायम राहण्यामागे कोणतं कारण आहे? अनेक दिग्दर्शकांवर मिथूनची रुंजी होती, तेव्हा त्याने १२ चित्रपट साईन केले होते. 

35 Mithun Chakraborty ideas | bollywood, vintage bollywood, bollywood stars

१६ जून, १९५० रोजी कोलकाता येथे मिथुन यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव गौरांग चक्रवर्ती असं आहे. पण, या नावाचा वापर त्यांनी कधीचं चित्रपटांत वापरले नाही. मिथुन बॉलिवूडच्या व्यक्तींच्या यांदीमध्ये आहे, ज्या कलाकारांचे कुठलेही चित्रपट बॅकग्राउंड नाही. इंडस्ट्रीत कुणी नी कुणी गॉडफादर असतो. परंतु, तरीही मिथुनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेहनतीने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. 

राजकारणात तरुण असल्यापासून मिथुन सक्रिय होता. अल्पवयीन असल्यापासून त्याचा त्यांच्या वडिलांशी वैचारिक मतभेद होते. चित्रपटात येण्यापूर्वी तो नक्षलवाद्यांशी संबंधित होता.  मिथुनची ओळख रवि रंजन नावाच्या एका लोकप्रिय नक्षलवाद्याशी ली होती. पोलिसदेखील मिथुनच्या मागावर हाेते. मिथुनचा भाऊ एका दुर्घटनेत मारला गेला. त्यामुळे दु:खी झालेल्या मिथुनसाठी नक्षलवादी जवळचा परिवार झाला. पुढे त्याने सर्वकाही सोडलं आणि चित्रपटात नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न केले. 

180 MC ideas in 2021 | mcs, bollywood, actors

मिथुन चक्रवर्तीची जीवन-यात्रा पाहिली तर मिथून खूप परिश्रम घेतले, त्याने बी.एससी. केलं, त्यामध्ये सुवर्णपदकही मिळवलं. तसेच ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. डान्समध्येही त्यांनी निपुणता मिळवली. ‘डिस्को डांसर’ गा त्यांचा गाजलेला चित्रपट आला. चित्रपट येण्यापूर्वी त्यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. 

त्यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’ (१९७६) होता. मृणाल सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मिथुन यांनी असा अभिनय केला की,  पहिल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मग, त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिध्दी मिळाली. सामान्य जनता मिथुन यांना गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणायची. मिथुन यांच्या फॅन्सची संख्यादेखील कोटीमध्ये होती.  

Actors, Bollywood actors, Photo

विवाहित असतानाही श्रीदेवीशी दुसरा विवाह 

मिथुनने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७६ मध्ये आलेला चित्रपट ‘मृगया’मधून केली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर  मिथुनने अनेक हिट चित्रपट दिले. तो एक यशस्वी अभिनेता होता. त्याचे नाव को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि अन्य अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण, श्रीदेवीसोबत त्याच्या अफेअरची चर्चा सर्वात अधिक झाली. १९८४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘जाग उठा इंसान’ मध्ये मिथुन-श्रीदेवी यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासून दोघांच्या अफेअरचे वृत्त येऊ लागले. मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलाखतीत स्वत: कबूल केलं होतं की, त्याने श्रीदेशी गुपचुप लग्न केलं. 

20 Mithun ideas | bollywood, bollywood stars, vintage bollywood

मिथून २०१४ ते २०१६ पर्यंत राज्यसभा सदस्य होते. तृणमुल काँग्रेसने आपल्या पक्षातून मिथुन यांना राज्यसभेत पोहोचवलं होतं. परंतु, मिथुन मधून राजकारण सोडले. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Mithun Chakraborty / Mithun Chakraborty - Bollywood Photos


 

Back to top button