सरु आणि सूर्याचा पुन्हा होणार विवाह सोहळा | पुढारी

सरु आणि सूर्याचा पुन्हा होणार विवाह सोहळा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत सध्या उत्सुकता आहे ती सरु आणि सूर्याच्या लग्नाची. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने त्यांचं लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच सहकुटुंब सहपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेत लग्नाची जय्यत तयारी केलीय. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा सरु आणि सूर्याचा विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

वाचा- स्वप्नील जोशीची ‘समांतर-२’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार 

लग्नाच्या निमित्ताने मोरे कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. अंजी पश्या आणि अवनी वैभवचा खास डान्स परफॉर्न्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे आनंदाचं जरी वातावरण असलं तरी अवनी आणि वैभवच्या नात्यातला तणाव मात्र कायम आहे. अवनी आई होणार आहे. मात्र आत्याने दिलेली जॉबची ऑफर वैभवने स्वीकारली तरच ती या मुलाला जन्म देईल अशी अट अवनीने घातली आहे. त्यामुळे वैभव नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे ‘सहकटुंब सहपरिवार’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका सहकुटुंब सहपरिवार सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Back to top button