'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार हास्यजत्रेची टीम - पुढारी

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार हास्यजत्रेची टीम

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर ‘हास्यजत्रा’ या शोची संपूर्ण टीम आपलं नशीब आजमावण्यास सज्ज होणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या शोचे संचालन सचिन खेडेकर हे करणार आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘हास्यजत्रा’ शोने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आपले समाजाप्रती असणारे कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम ‘कोण होणार करोडपती’ च्या मंचावर येणार आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी खेळणार आहेत.

गेल्या जुलै महिन्यात आलेल्या महापुराने चिपळून येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे नुकसान झाले होते. त्यामुळे चिपळूणमधील १५६ वर्षांचा हा वाचन इतिहास पुन्हा उभा करण्यासाठी अशोक नायगावकर आणि इतर सर्वजण आपल्यापरीने मदत करत आहेत.

याच दरम्यान ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर हास्यजत्रेची टीमने समाजकार्य करण्याच्या उद्देशाने पुढाकार घेतला आहे. या शोत जिंकलेली सर्व रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या पुनरुभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. या शोचे संचालन सचिन खेडेकर हे करणार आहेत.

कोकणातील पहिलेच ऐश्वर्यसंपन्न संग्रहालय

या वर्षी लोकमान्य टिळकांचं १०१ वे पुण्यसमरण झालं. चिपळूण येथे हजारो पुस्तकं, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी, सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा सर्व गोष्टींचा संग्रह केलेला आहे. संपूर्ण कोकणात असे पहिलेच ऐश्वर्यसंपन्न संग्रहालय आहे.

पाहा, कोण होणार करोडपती, शनिवार, ७ ऑगस्ट रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : प्रियांका चोप्रा आणि कोल्हापुरी स्ट्रॉंग वुमन 

Back to top button