दिशा पटानीचा हॉट बिकिनीत जलवा  | पुढारी

दिशा पटानीचा हॉट बिकिनीत जलवा 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि बिकिनी हे समीकरण बनलेलं आहे. कारण, तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या फोटोंनी भरलेले आहे. खास म्हणजे, तिचे असंख्य बिकिनीतील फोटो तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. विविध बिकिनी घालून तिने फोटोशूटदेखील केले आहे. तर परदेशात समुद्र किनारी तिच्या रंगबेरंगी बिकिनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नुकताच दिशाने व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती डोळे मिटून पाण्याच्या मध्यभागी उभी आहे. तिला पाहिल्यानंतर फॅन्स तिला भरभरून कमेंट करत आहेत. तिचे चाहतेही या फोटोला पाहून घायाळ झाले आहेत.

स्लिम फिट दिशा व्हाईट बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पाण्यामध्ये ती डोळे मिटून शांत उभी आहे. दिशा अलीकडेच सलमान खानच्या ‘राधे’चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे दोन्ही गाणी सिनेरसिकांना आवडली. 

एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की, “मॅम आपण खूपचं स्टनिंग दिसत आहात.” दुसऱ्या युजरने लिहिलंय, “तू स्वत:ला फिट ठेवलं आहेस.” तिसऱ्या युजरने तिला सुंदर म्हटलं आहे. अन्य युजरनी हार्ट इमोटिकॉन शेअर करून कमेंट केले आहेत. 

हा थ्रोबॅक फोटो तिच्या व्हेकेशनचा आहे…यादरम्यान, दिशा जेव्हा जेव्हा वर्कआउटसाठी बाहेर जाते तेव्हा टायगर श्रॉफसोबत रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी जाते. मागील आठवड्यात दिशा टायगर, अर्जुन कपूर आणि रणबीर कपूरसोबत फुटबॉलच्या मैदानावर दिसली होती. या रविवारी ती खेळाचा आनंद घेताना दिसली होती. 

दिशा आगामी चित्रपट एक विलेन रिटर्न्समध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, तारा सुतारियासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Back to top button