मलायकाला आठवला अपघाताचा दिवस! | पुढारी

मलायकाला आठवला अपघाताचा दिवस!

पुढारी ऑनलाईन : पुण्यातून मुंबईला येत असताना 2 एप्रिलला मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला होता. आता एका मुलाखतीत तिने या अपघाताच्या कटू आठवणींना उजाळा दिला.

तिने सांगितले, ती रात्र भयानक होती. माझ्या चारही बाजूंना रक्‍ताचा सडा पडलेला होता. माझे कुटुंबीय, अर्जुन आणि सगळे लवकरात लवकर तिथे येऊन पोहोचले. सगळेच अतिशय घाबरले होते. लोकांनी मला सांगितले की मी बेशुद्ध असताना माझ्या आईबद्दल आणि मुलगा अरहानबद्दल विचारत होते. त्यावेळी मी केवळ दोन प्रार्थना करीत होते.

एक तर मला मरायचे नव्हते आणि दुसरे म्हणजे मला माझे डोळे गमवायचे नव्हते. गाडीच्या काचांचे तुकडे माझ्या डोळ्यात शिरले होते आणि कपाळावर मोठी जखम झाली होती. त्यानंतर मला कारमध्ये बसण्याचीही भीती वाटू लागली. मात्र, या घटनेनंतरही मी थांबणार नाही!

हेही वाचलंत का? 

Back to top button