यो यो हनी सिंग याच्या पत्नीचा आरोप; मी कपडे बदलताना सासरा रुममध्ये घुसला - पुढारी

यो यो हनी सिंग याच्या पत्नीचा आरोप; मी कपडे बदलताना सासरा रुममध्ये घुसला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : यो यो हनी सिंग याच्या पत्नीने सासऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. मी कपडे बदलत असताना सासरा माझ्या रुममध्ये घुसला. असे यो यो हनी सिंगची पत्नी शालिनीने म्हटले आहे.

पंजाबी गायक आणि अभिनेता हनीची पत्नी शालिनीने हनीच्या कुटुंबाविरोधात याचिका दाखल केली आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिला त्रास दिल्याचा आरोप करत तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शालिनीने हनीच्या वडिलांवर म्हणजेच सासऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. ३८ वर्षीय शालिनी तलवारने दावा केला की, एकदा तिचे सासरे दारुच्या नशेत तिच्या खोलीत गेले. जेव्हा ती कपडे बदलत होती, तेव्हा ते अचानक खोलीत घुसले.

शालिनी म्हणाली , जेव्हा ती कपडे बदलत होती, तेव्हा त्यांनी मला स्पर्श केला. मागील १० वर्षांपासून तिच्यासोबत हनीचा परिवार खूप क्रूरतेने वागत आहे. हनीने मागील काही वर्षांमध्ये मारहाण केली. मी घाबरून जगत आहे. त्याच्या परिवाराने शारिरिक नुकसान पोहोचवण्याची धमकीही दिली होती. माझ्याकडे पुरावे आहेत.

शालिनीने घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत २० कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

जनावरांसारखा व्यवहार केला : शालिनी

हनीची पत्नी शालिनी तलवारच्या माहितीनुसार, एकदा तिला १८ तासांपेक्षा अधिक काळ अन्न पाण्याविना खोलीत बंद करून ठेवले होते.

तसेच तिला नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला होता. सतत निर्दयीपणे अत्याचार होत राहिले. मी स्वत: एखाद्या जनावरासारखे अनुभव घेत होते.

 

Back to top button