इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहणारी गहना वशिष्ठ कशी झाली पॉर्न स्टार! | पुढारी

इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पाहणारी गहना वशिष्ठ कशी झाली पॉर्न स्टार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्नोग्राफी केसमध्ये राज कुंद्रा सोबतच अभिनेत्री गहना वशिष्ठ अडचणीत आली आहे. आता गहना वशिष्ठ इंस्टाग्रामवरील न्यूड लाइव्ह सेशनमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठ हिला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने याआधी पॉर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी अटक केली होती.

गहना वशिष्ठ
गहना वशिष्ठ

दरम्यान, गहनाच्या इंस्टाग्रामवरील लाइव्ह सेशनमुळे खळबळ उडाली. तिने लाइव्ह सेशनमध्ये असे काही केले की ज्यामुळे तिच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. गहना इंस्टाग्रामवर सुमारे ३ मिनिटे लाइव्ह आली होती. यात तिने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले नसल्याचा दावा करत हा व्हिडिओ पॉर्न आहे का, असा सवाल तिने चाहत्यांना केला.

गहनाने मिस आशिया बिकिनी क्राऊनचा किताब जिंकला होता. तसेच तिने हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्येही काम केले आहे. ८५ पेक्षा अधिक पॉर्न चित्रपट बनवून ते ऑनलाईन विकल्याचा तिच्यावर आरोप आहे.

गहना वशिष्ठ
गहना वशिष्ठ

गहना याआधी अनेकवेळा पॉर्न चित्रपटांमुळे चर्चेत आली होती. या पार्श्वभूमीवर गहना वसिष्ठ विषयी जाणून घेऊया.

कॉम्प्यूटर सायन्समधून इंजिनिअरींग…

गहना वसिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडमधील चिमरी गावात झाला. तिची आई गृहिणी असून वडील शिक्षणाधिकारी होते. गहनाला तिचे मित्र जिंदगी नावाने बोलवतात.

गहनाचा स्वभाव खूप लाजाळू होता. ती कधीही कोणाबरोबर जास्त बोलत नव्हती. तरीही तिने कॉलेजच्या ब्युटी कंटेस्टमध्ये सहभाग घेतला होता. गहनाने कॉम्प्यूटर सायन्समधून इंजिनिअरींगची पदवी मिळवली आहे. भोपाळमधील महाविद्यालयातून तिने इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले.

तिला पुढे मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने आपले नाव बदलून गहना वशिष्ठ असे ठेवले.

गहनाला झाली होती मारहाण…

तिला अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने २०१२ मध्ये मिस आशिया बिकिनी किताब जिंकला. गहना अनेकवेळा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली. एका फोटोशूटमुळे तिला मारहाण देखील झाली होती.

गहना वशिष्ठ
गहना वशिष्ठ

२०२० मध्ये गहना वशिष्ठ पहिल्यांदा चर्चेत आली जेव्हा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गहनानं या व्हिडिओत आपल्या कमरेखाली तिंरगा लपटेला होता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबईत काही लोकांनी तिला मारहाण केली. या व्हिडिओवर गहनानं म्हटलं होतं की तो व्हिडिओ तिच्या मित्राने अपलोड केला होता. मात्र, हा के‍वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे नंतर समोर आले.

शुटिंग दरम्यान झाली होती गंभीर जखमी…

२०१९ मध्ये गहना शुटिंग दरम्यान गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही न खाता-पिता तिने शुटिंग केल्याने ती बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

क्रिकेट अँकर म्हणून आली होती चर्चेत…

गहनानं ‘फिल्मी दुनिया’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पर्दापण केलं. तिने तेलुगू चित्रपटांतही काम केले आहे. अल्ट बालाजीची वेब सीरिज ‘गंदी बात’ मध्ये देखील ती दिसून आली. त्याशिवाय तिने ‘बहनें’ या टीव्हीवरील मालिकेत काम केले. तिने आतापर्यंत ७०-८० जाहिरातींमध्ये काम केले आहे.

त्याशिवाय तिने सुमारे ३० दाक्षिणात्य चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिने क्रिकेट वर्ल्डकप २०१५ दरम्यान योगराज सिंह आणि अतूल वासन यांच्यासोबत अँकर म्हणून एक शो होस्ट केला होता. हा शो खूप गाजला होता.

हे ही वाचा :

 

 

Back to top button