monalisa bagal : मोनालिसाचे अक्षय्य तृतीया फोटोशूट , पिवळ्या साडीत साजशृंगार

monalisa bagal
monalisa bagal
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मराठमोळी अभिनेत्री मोनालिसा बागल (monalisa bagal) हिने अक्षय तृतीयेला एक खास फोटोशूट केला आहे. तिने पिवळ्या रंगाच्या साडीत हा फोटोशूट केला आहे. साजशृंगार करून मोनालिसाने आपल्या सौंदर्याकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. मोनालिसाच्या (monalisa bagal) नावावर हटके चित्रपट आहेत. तिने यापूर्वीही फोटोशूट केले आहेत. तिचे फोटोशूटही पाहण्यासारखे असतात. पिवळ्या रंगाच्या पेहरावात ती अतिशय सुंदर दिसत आहे. तितकीच ग्लॅमरस ती अन्य फोटोंमध्ये दिसतेय. तिचा हा फोटोसूट व्हायरल होतोय.

मोनालिसा बागल
मोनालिसा बागल

पिवळ्या रंगाची साडी, त्यावर कमरपट्टा आणि लाल रंगाचे शोभेल असे ब्लाऊज, मोती ज्वेलरी, कानात झुमके आणि बिंदी असा परिपूर्ण लूक उठावदार दिसत आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीचा हा साजशृंगार सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तिचा गस्त हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तसेच सैराट फेम तानाजी गालगुंडे मुख्य भूमिकेत होता. तिने 'झाला बोभाटा', 'परफ्यूम', 'ड्राय डे', प्रेम संकट', 'गस्त' ,यासारख्या चित्रपटांत अभिनय केलाय. अल्पावधीतचं तिने स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. दरम्यान तिचा 'माझी मैना' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. "हो तिची दुनिया ही न्यारी तिची स्टाईल पुराणी जशी आहे मनाची राणी… कधी राऊंड राऊंड फिरे साऊंड लाऊड लाऊड करे ति गाते मर्जिची गानी…आली लाली गाली 'माझी मैना' आहे निराली…" या दोन-तीन ओळीत मैना कशी आहे हे प्रत्येकाला समजलं. मोनालिसाने आतापर्यंत वेगवेगळ्या पठडीतील भूमिका साकारल्या आहेत.

मोनालिसाने सौ. शशी देवधर या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या बालपणीची भूमिका केली. 'झाला बोभाटा' या चित्रपटात मोनालिसा अभिनेत्री म्हणून झळकली होती. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल ती म्हणते, 'कामातूनच काम मिळत गेलं. स्वप्नपूर्ती म्हणजे काय असतं, हे या चित्रपटामुळे कळलं. शून्य ओळख घेऊन मी इथं पाऊल टाकलं होतं. या भूमिकेसाठी मला विविध पुरस्कारांसह राज्य सरकारच्या पुरस्कारांत नामांकन मिळालं. त्यानंतर मला भरपूर काम मिळालं. आता माझे सात चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला. या चित्रपटानं आज मी जिथं आहे, तिथपर्यंत मला पोहोचवलं आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news