करिश्मा कपूर पुन्हा लग्‍न करणार का? | पुढारी

करिश्मा कपूर पुन्हा लग्‍न करणार का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

करिश्मा कपूरने आपली चित्रपट कारकिर्द चांगली घडवली; पण दुर्दैवाने तिचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते. उद्योगपती संजय कपूरबरोबर तिचे 2003 मध्ये लग्‍न झाले होते व या लग्‍नापासून तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. दोघांमधील वादाच्या सतत बातम्या येत असत आणि करिश्माने आपल्या पतीवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोपही केले होते. या दोघांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर ती पुन्हा लग्‍न करणार का, असा तिच्या चाहत्यांना प्रश्‍न पडलेला आहे. करिश्मा सोशल मीडियातही चांगली सक्रिय असते. तिने नुकतेच चाहत्यांबरोबर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले होते. त्यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे देताना तिने आवडता पदार्थ बिर्याणी, रंग काळा अशी काही उत्तरे दिली. ‘पुन्हा लग्‍न करणार का?’ हा प्रश्‍न कुणीतरी विचारल्यावर तिने गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करीत ‘विचार करेन, परिस्थितीवर अवलंबून असेल’ अशा थाटाचे उत्तर दिले.

Back to top button