सोनाक्षीची ‘दहाड’! | पुढारी

सोनाक्षीची ‘दहाड’!

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘दबंग’मधून पदार्पण केलेल्या सोनाक्षी सिन्हाने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हाच्या या लेकीचा मोठाच चाहतावर्गही आहे. मात्र, अलीकडे तिच्या करिअरच्या गाडीचा वेग मंदावल्यासारखा दिसून येत होता. अशावेळीच आता तिच्या ‘दहाड’ या नव्या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करीत आहे. ‘दहाड’मध्ये तिने एका पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासमवेत विजय वर्मा, सोहम शाह आदींच्या भूमिका आहेत.

रिमा कागदी आणि झोया अख्तर यांचा हा चित्रपट आहे. सोनाक्षीने ‘दबंग’ चित्रपटांबरोबरच ‘लुटेरा’, ‘राऊडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’,‘मिशन मंगल’सारख्या चित्रपटांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली होती. आता तिच्या ‘दहाड’चा आवाज किती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो हे पाहायचे!

Back to top button