Kiara Advani : कुणाला विसरावं असे वाटत नाही! | पुढारी

Kiara Advani : कुणाला विसरावं असे वाटत नाही!

पुढारी ऑनलाईन : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपच्या चर्चेने त्यांचे चाहते निराश झाले आहेत. दोघेही बर्‍याच काळापासून एकमेकांना डेट करीत होते. लवकरच हे दोघे लग्‍नाच्या बेडीत अडकतील असे अनेकांना वाटत होते. मात्र, त्यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत.

कियाराची प्रमुख भूमिका असलेला ‘भूलभुलय्या-2’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलर लाँचवेळी कियाराने एका प्रश्‍नाचे उत्तर देत असताना जे काही सांगितले त्याचा संबंध सिद्धार्थशी जोडला जात आहे. एका पत्रकाराने तिला विचारले की चित्रपटाचे नाव ‘भूलभुलय्या’ आहे. तू तूझ्या खर्‍या आयुष्यात कुणाला विसरू इच्छितेस? यावर कियाराने सांगितले, ‘अजिबात नाही, मी माझ्या आयुष्यात ज्या व्यक्‍तींना भेटले आहे, जे माझ्या आयुष्याशी जोडले गेले आहेत, त्यामधील कुणाला कधीच विसरावं असे मला वाटत नाही!’

कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

Back to top button