mouni roy : ‘ब्रह्मास्त्र’साठी घेतले ‘इतके’ मानधन | पुढारी

mouni roy : ‘ब्रह्मास्त्र’साठी घेतले ‘इतके’ मानधन

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरची ‘नागीण’ मौनी रॉय आता ‘ब—ह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात मौनीने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिने तीन कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे सांगितले जाते. रणबीर कपूरने या चित्रपटासाठी 30 कोटी, आलियाने 12 कोटी, अमिताभ बच्चन यांनी 8 कोटी आणि नागार्जुनने बारा कोटी रुपये घेतल्याचीही चर्चा आहे. या सर्वांच्या तुलनेत मौनीला कमी मानधन मिळालेले असले तरी छोट्या पडद्यावरून आलेल्या तिच्यासारख्या अभिनेत्रीला ‘ब—ह्मास्त्र’ ही मोठीच संधी आहे. अलीकडेच तिने लग्न करून संसारही थाटला आहे. आता संसार व कारकिर्द अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत तिची वाटचाल सुरू राहणार आहे.

Back to top button