गर्भवती सोनम कपूरचे फोटोसेशन | पुढारी

गर्भवती सोनम कपूरचे फोटोसेशन

पुढारी ऑनलाईन : सोनम कपूरने ‘गुड न्यूज’ दिल्यापासून तिचे बेबी बंप दर्शवणारे अनेक फोटो समोर येत आहेत. कधी ती नवर्‍याच्या मांडीवर विसावलेली असते तर कधी राजेशाही थाटाचा पोशाख घालून बसलेली असते. आता तिने काळ्या रंगाचा, पारदर्शक पोषाख परिधान करून नवे फोटोशूट केले आहे.

हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये सोनमने ब्लॅक कलरचा नेटेड सलवार सूट परिधान केलेला आहे. वेगवेगळ्या पोजमधील हे फोटो नेटकर्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकंदरीत गर्भवती असतानाही ‘अभिनेत्री’ सोनममधील ‘मॉडेल’ जागी आहे.

सोनमला बॉलीवूडची ‘स्टाईल आयकॉन’ किंवा ‘फॅशन आयकॉन’ असे म्हटले जाते. आता गर्भवती असतानाही तिने आपली ही ओळख अशी कायम ठेवली आहे. अलीकडेच तिच्या दिल्‍लीतील सासरच्या घरात मोठी चोरी झाली होती व त्यामुळेही ती चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button