क्रिती सेननचा ‘शहजादा’! | पुढारी

क्रिती सेननचा ‘शहजादा’!

पुढारी ऑनलाईन : क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या ‘शहजादा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मग्‍न आहेत. अलीकडेच दोघेही चित्रपटाचे मॉरिशसमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण करून मुंबईत परत आले. त्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत दोघे विमानतळावरून बाहेर येत असताना दिसून येतात. दोघांची ‘केमिस्ट्री’ चांगलीच दिसून आली. एकमेकांना निरोप देताना त्यांनी अलिंगनही दिले.

हा व्हिडीओ पाहून अनेकांना वाटले की दोघे एकमेकांना डेट करीत आहेत! रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटात सनी हिंदुजाही प्रमुख भूमिकेत आहे. तेलगू सुपरस्टार अल्‍लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या ‘आल्हा वैकुंठपूर्मुलु’ या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button