तुषारच माझा मोठा सपोर्टर : कंगना | पुढारी

तुषारच माझा मोठा सपोर्टर : कंगना

नवी दिल्ली :

आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणारी कंगना राणावत सध्या ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या रिअ‍ॅलिटी शो ‘लॉक अप’मुळेही चर्चेत राहू लागली आहे. या शोमध्ये रोज काही ना काही तरी नवा हंगामा होतच असतो. या शोमध्ये एकता कपूर आपला भाऊ तुषार कपूरसोबत पोहोचली.

कंगनाच्या ‘लॉक अप’ शोमधील सर्व कैद्यांची तुषार कपूरने भेट घेतली. यावेळी तुषारने कंगनाबद्दल बोलताना सांगितले की, मी आपल्यासोबत चर्चा करण्यास फारच उत्सुक होतो. तुम्ही मला पसंत असणार्‍या अभिनेत्रींपैकी एक आहात. मी नेहमीच तुमचे चित्रपट पाहत असतो. यावर ट्विटही करतो. यावेळी कंगनाने सांगितले की, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुषार कपूरएवढा मोठा माझा सपोर्टर कोणीच नाही. या इंडस्ट्रीत माझे अनेकांशी भांडण झाले आहे. मात्र, अनेकवेळा सर्वप्रथम तुषारनेच मला पाठबळ दिले आहे.

Back to top button