तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम अमृता पवार हिचा साखरपुडा | पुढारी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम अमृता पवार हिचा साखरपुडा

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरील मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मधील प्रसिध्द अभिनेत्री अमृता पवार हिचा साखरपुडा पार पडला आहे. तिने गुपचूपपणे हा साखरपुडा उरकल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारीत आहे. काही कालावधीतचं या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांवर रुंजी घातलीय.

मालिकेत अमृता पवार आणि हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत त्यांनी सिड आणि अदिती प्रेक्षकांची भूमिका साकारलीय.

अदिती दिसायला खूप सुंदर आहे. तिने घरात सर्वांना समजून घेणारी हार्दिक जोशीची पत्नी म्हणून तिने चांगल्या प्रकारे आपली कामगिरी पार पाडलीय.

अमृताचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. तिच्या जोडीदाराचे नाव नील पाटील आहे. पण, त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. अमृताने आप्या जोडीदारासोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अमृता पवार हिने टीव्हीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Pawar (@pawaramruta)

Back to top button