पूजा सावंत 'भेटली ती पुन्हा २' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

पूजा सावंत 'भेटली ती पुन्हा २' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पूजा सावंत ‘भेटली ती पुन्हा २’ चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भेटली ती पुन्हा 2 हा आधीचा भेटली तू पुन्हा या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

अधिक वाचा – 

pooja sawant
पूजा सावंत

भेटली तू पुन्हा २८ जुलै २०१७ ला प्रदर्शित होता. या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाले. याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. सोशल मीडियावरून या चित्रपटाविषयी जाहीर केले आहे.

अधिक वाचा- 

पण, या चित्रपटातून अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

अधिक वाचा- 

देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज याचित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

pooja sawant
पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी

जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून पदार्पण

या सिक्वेलद्वारे जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

संजय जमखंडी या चित्रपटाचे लेखन करत आहेत.

अतिशय हलकीफुलकी कथा आणि वैभव तत्ववादी, पूजा यांच्या अभिनयाने चित्रपट सजला.

उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूने चित्रपटाला परिपूर्ण बनवले.

“हरवू जरा….”, “जानू जानू….” अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ आधीच्या चित्रपटात पहायला मिळाला होता.

प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेल होताना चित्रपटाच्या कथेने काय वळण घेतले आहे.

हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे देखील वाचा – 

पाहा  व्हिडिओ – कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

 

Back to top button