तंदुरुस्तीसाठी साराचे कठोर परिश्रम | पुढारी

तंदुरुस्तीसाठी साराचे कठोर परिश्रम

नवी दिल्ली :

सारा अली खान ही नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. सदानकदा आपल्या फिटनेसाठी ती प्रयत्न करत असते. यामुळेच ती योगा क्लास अथवा जीमबाहेर स्पॉट होत असते. आपल्या डेली रूटिनमध्ये सारा तब्बल तीन तास वर्कआऊट करते. तिच्या सौंदर्याचे हे एक प्रमुख कारण आहे. साराने इन्स्टाग्रामवर आपल्या फिटनेस रूटिनची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये ती बारबेल, लो लंजेज, किक बॉक्सिंग, योग, जंप स्क्वॉटस् आणि जलतरण करताना दिसते. सारा आपल्या कोअर आणि लोअर बॉडी मसल्सना मजबूत आणि सक्षम करण्यासाठी बारबेल स्क्वॉटस् करते. तर हिप्स, हॅमस्ट्रिंग आणि हार्टरेट चांगला ठेवण्यासाठी जंप स्क्वॉटस्चा वापर करते. तसेच आपल्या शरीराला लवचिक बनविण्यासाठी पिलाटे करण्यावर भर देते.

Back to top button