Nia Sharma : नियाचा ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले, आता कळालं हा तर... | पुढारी

Nia Sharma : नियाचा ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले, आता कळालं हा तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री निया शर्मा तिच्या एकापेक्षा एक बोल्ड फोटोजमुऴे सोशल मीडियावर चर्चे राहते. ती आपले व्हिडिओज आणि बोल्ड फोटोज शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता नियाने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नियाने बाथरूममध्ये हे फोटोशूट केले आहे. तिच्या ड्रेसचा हाय कटने मात्र सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

अभिनेत्री निया ग्लॅमरच्या दुनियेतील एक मोठे नाव आहे. सोशल मीडियावर नियाचे फोटो आणि व्हिडिओ रोजच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा नियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोशूटला खूप पसंती दर्शवली जात आहे.
या फोटोंमध्ये नियाच्या ड्रेसमध्ये हाय कट दिसत आहे. त्यामुळे तिचा हा ड्रेस आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. निया ३१ वर्षांची आहे. ती अभिनयापेक्षा फॅशन स्टेटमेंटसाठी जास्त चर्चेत असते.

चाहतेही तिचे भरभरून कौतुक करत आहेत. काही तासांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सोशल मीडियावर ती नेहमी एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते.

निया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नियाने अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु, ती टीव्ही मालिका ‘एक हजारों में मेरी बहना हैं’ मधून प्रसिध्द झाली. ती ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. निया २०२० मध्ये खतरों के खिलाडी शोचा विजेती ठरली होती. ती नागिन-४ मध्ये दिसली होती. या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. निया रिअल लाईफमध्येही सुंदर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Back to top button