Anshula Kapoor : अर्जुन कपूरच्या बहिणीचं ट्रान्सफॉर्मेशन (Photos)

anshula kapoor
anshula kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

आवडत्या स्टार किड्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) यांच्या नावाचा समावेश आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप ॲक्टीव्ह असतात. दोघेही अनेकदा त्यांची मते आणि विचार चाहत्यांशी शेअर करतात. नुकतीच अंशुला कपूरने (Anshula Kapoor) एक पोस्ट शेअर करून भावनिक पोस्ट लिहिलीय. अंशुलाची ही पोस्ट पाहून चाहते कमेंट करत आहेत. तिने आपले नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही.

अंशुला कपूर
अंशुला कपूर

वास्तविक, अंशुलाचे वजन खूप कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिने तिच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. अंशुलाने शेअर केलेल्या छायाचित्रात तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे. जिममधला एक फोटो शेअर करत अंशुला लिहिते, "आज माझ्यासाठी निरोगी असण्याचा अर्थ आरशात स्वतःला पाहण्यापेक्षा जास्त आहे."

अंशुला कपूर
अंशुला कपूर

अंशुला पुढे लिहिते, "माझं मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं लक्षात आल्यावर मी स्वत:ला निरोगी बनवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं. मी इतर कशावरही काम सुरू करण्यापूर्वी, मला हे लक्षात येऊ लागलं की मी आत काय खात आहे. हे सर्वात अस्वस्थ होतं आणि माझ्यासाठी कठीणही. खूप अनिश्चितता, भीती, अडथळे, अस्वस्थता, स्वत: ची शंका, मला जाणवले की मी थेरपी घ्यावी. आणि अशा प्रकारे माझ्या उपचारांना सुरुवात झाली."

अंशुला म्हणते की, २ वर्षांचा मोठा प्रवास झाला आहे आणि मी अजूनही प्रगतीपथावर आहे. माझ्या स्वत:च्या मूल्यांचा माझ्या शरीराच्या आकाराशी काहीही संबंध नाही, हे समजायला मला बराच वेळ लागला. मला जाणवले की माझ्या स्वतःच्या अपूर्णतेला शाप देऊन मला काही फायदा होणार नाही. मी अजूनही स्वतःवर प्रेम करायला शिकत आहे. मी माझ्यातील दोष स्वीकारत आहे. जगण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे."

अंशुला म्हणते, "मी कबूल करते की माझ्यात अनेक त्रुटी आहेत, पण मी योग्य आहे." अंशुलाच्या या पोस्टवर कमेंट करताना जान्हवी कपूरने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक केले. तर शनाया कपूरने हार्ट इमोजी शेअर केला आहे.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news