पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार किड्सपैकी असलेली सुहाना खान सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तिने तिच्या इंन्स्टाग्रामनर व्हिडिओ शेअर केला. यातील तिच्या हटके अंडरवॉटर स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये ती चांगलीच चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये किंग खानची लाडकी मुलगी सुहाना खानसोबत अनन्या पांडे आणि शनाया कपूरही दिसत आहेत. सुहाना-अनन्या आणि शनाया या लहानपणापासूनच खास मैत्रिणी आहेत. त्या तिघीही अनेक प्रसंगी एकत्र येऊन काहीतरी धमाका करत असतात. बॉलिवूडमध्ये या तिघींना स्टार किड्स म्हणूनही ओळखले जाते.
तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये सुहाना खानसह शनाया कपूर आणि अनन्या पांडे स्विमिंग पूलमध्ये हटके पोज देताना दिसत आहेत. पाण्याखाली जाताना सुहानाने कॅमेराकडे पाहत हटके बोल्ड पोज दिली आहे.या व्हिडिओवर काही चाहत्यांनी तिची प्रशंसा करत भरभरून कमेंट देखील केल्या आहेत. यापूर्वीही सुहाना खानने तिच्या बोल्ड लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर 'धर्मा प्रोडक्शन' च्या 'बेधडक' या नवीन चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर लाँच करण्यात आले आहे. अनन्या पांडे बद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने २०१९ ला प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती. सुहाना खानबद्दल तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, अजून तिने बॉलिवूड सृष्टीत पदार्पण केलेले नाही. तरीही तिझा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे, तिचे अनेक चाहते तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत.