पोर्नोग्राफी केस : पोलिसांसमोर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी | पुढारी

पोर्नोग्राफी केस : पोलिसांसमोर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पोर्नोग्राफी केस प्रकरणी चौकशी झाल्यानंतर शिल्पा शेट्टी पोलिसांसमोर ढसाढसा रडली. पोर्नोग्राफी केस प्रकरणी तिचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर शिल्पाला ट्रोल केलं जात आहे. ती राज कुंद्राच्या अनेक कंपन्यांची बिझनेस पार्टनरदेखील आहे. शिल्पा शेट्टीच्या नावावर २३ कंपन्या आहेत आणि राज ९ कंपन्यांचा मालक आहे.

अधिक वाचा – 

मुंबई क्राईम ब्रँचने शिल्पा-राजच्या जुहू येथील घरी छापा टाकला. तेथे पोलिस राजला सोबत घेऊन आले होते. त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि राज यांच्यात वाद झाला. पोलिसांनी तेथे शिल्पाची देखील दीर्घ चौकशी केली. पण, शिल्पाने स्पष्ट सांगितले की, तिला हॉटशॉट ॲपविषयी काही माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीनंतर शिल्पा घाबरली होती.

अधिक वाचा – 

पोलिसांसमोर रडली शिल्पा

एका मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा पोलिस राजला घेऊन त्याच्या घरी पोहोचली. तेव्हा शिल्पा-राज यांच्यात वाद झाला. त्यानंतर शिल्पा स्वत:ला रोखू शकली नाही. ती पोलिसांसमोर ढसाढसा रडली.

अधिक वाचा – 

pornography case
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

राजने एडल्ट कंटेंट नाही बनवलं

जेव्हा शिल्पाची चौकशी झाली. तेव्हा ती म्हणाली की, तिचा पती राजने कोणताही पोर्नोग्राफिक कंटेंट बनवलं नाही. त्या कंटेंटला एडल्ट म्हटलं जाऊ शकत नाही. पण, इरोटिका म्हटलं जाऊ शकतं.

या प्रकारचा कंटेंट वेब सीरिजमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.

शिल्पा शेट्टीसाठी बंद हाेणार
‘सुपर डान्सर’चे दरवाजे?

शिल्पासाठी सुपर डान्सर चॅप्टर ४ चे दरवाजे बंद होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मागील आठवड्यात सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर होती. तेव्हा करिश्मा कपूरने परीक्षक म्हणून काम पाहिले. येणाऱ्या आठवड्यात देखील शिल्पा या शोमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, असे वृत्त समोर आले आहे. यावेळी रितेश आणि जेनेलिया देशमुख हे परीक्षक म्हणून उपस्थित असणार आहेत.

रितेश-जेनेलियाकडे जेव्हा सुपर डान्सरची ऑफर आली तेव्हा त्यांनी तत्काळ होकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, या एपिसोडमध्ये
रितेश-जेनेलिया डान्सचा तडकादेखील लावणार आहेत.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

 

Back to top button