Kabhi Eid Kabhi Diwali : प्रतीक्षा संपली ! सलमान-पूजाचा चित्रपट 'या' दिवशी भेटीला | पुढारी

Kabhi Eid Kabhi Diwali : प्रतीक्षा संपली ! सलमान-पूजाचा चित्रपट 'या' दिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ म्हणून ओळखला जाणारा सलमान खानने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. इतकंच नाही तर सलमानचा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सलनान आणि मराठी अभिनेत्री पूजा हेगडेचा आगामी ‘कभी ईद कभी दिवाळी’  ( Kabhi Eid Kabhi Diwali ) हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहे. तर सध्या या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

नुकतेच सलमान खान आणि साजिद नाडियादवाला यांचा एक फोटो ट्विटवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘कभी ईद कभी दिवाळी’ ( Kabhi Eid Kabhi Diwali ) हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील खास म्हणजे, सलमान खानच्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानचा वाढदिवस २७ डिसेंबरला असतो. यामुळे या चित्रपटाची उत्सुकता चाहत्याना लागून राहिली आहे.

‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटाची कथा दिग्दर्शक साजिद नाडियादवाला याची आहे. कॉमेडी, ड्रामा, इमोशन, धमाकेदार अॅक्शन चित्रपटातून चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ही फ्रेश जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबत साऊथचा सुपरस्टार व्यंकटेश दिसणार आहे.

कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला होता. परंतु, आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. आणि चित्रपटाचे शूटिंग येत्या एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button