या देशात ‘बधाई दो’ केवळ रात्रीच दाखवणार | पुढारी

या देशात ‘बधाई दो’ केवळ रात्रीच दाखवणार

पुढारी ऑनलाईन

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा समलैंगिकता या विषयावरील सामाजिक-विनोदी चित्रपट ‘बधाई दो’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात राजकुमार रावने गे पोलिस अधिकार्‍याची तर भूमी पेडणेकर हिने लेस्बियन प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या दोघांचे लग्‍न झाल्यावर काय होते, समलैंगिक जोडप्यासमोरील आव्हाने याची कहाणी चित्रपटात आहे. हा चित्रपट आता संयुक्‍त अरब अमिरातीमध्येही रीलिज केला जाणार आहे. तथापि, शारजामध्ये चित्रपट रीलिज केला जाणार नाही. शिवाय तेथील सेन्सॉर बोर्डने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार हा चित्रपट 21 वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच असेल. तसेच चित्रपटाचा केवळ रात्रीचाच शो असणार आहे.

Back to top button