Bade Miyan Chote Miyan : अक्षय- टायगर श्रॉफचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Bade Miyan Chote Miyan : अक्षय- टायगर श्रॉफचा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' ( Bade Miyan Chote Miyan ) हा चित्रपट लवकरच येत असून, चित्रपटाच्या रिलीज डेट समोर आली आहे. अक्षय आणि टायगरच्या जोडीचा पुढच्या वर्षी म्हणजे, ख्रिसमसच्या मुहूर्तावर २०२३ रोजी भेटीला येणार आहे. सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

टायगर श्रॉफने नुकतेच सोशल मीडियावर आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' ( Bade Miyan Chote Miyan ) चित्रपटाचा ट्रेलरची एक झलक रिलीज केली आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा एक हेलीकॉप्टर शहरात येत असल्याचे दाखविले आहे. त्यानंतर टायगर दोरीच्या सहाय्याने त्याच्या शुत्रूच्या गुन्हेत शिरतो. आत पोहोचल्यानंतर त्याने पहिल्यांदा शुत्रूवर धुरांच्या नळगाडा सोडून त्याच्यावर हल्ला करताना दाखवण्यात आलं आहे. याशिवाय शेवटी या ट्रेलरमध्ये टायगरला अक्षय कुमार येवून मिळतो आणि दोघेजण चांगले मित्र बनतात. या धमाकेदार ट्रेलरवरून 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेजण पहिल्यांदाच एकत्रित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमार बडे मियाँची तर टायगर श्रॉफ छोटे मियाँची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शनसोबत मनोरंजनाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे.

अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने टायगर श्रॉफला टॅग करत लिहिले आहे की, "ज्या वर्षी तू या जगात जन्माला आलास त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे. तू आज माझ्याशी टक्कर देशील का?, चल तर परत होणार फुल ॲक्शन. छोटे मियाँ?. असे लिहिले आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट जॅकी भगनानीच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत आहे. ३०० कोटींच्या मेगा बजेट चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अली अब्बास जफरवर आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि गोविंदाचा लोकप्रिय चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ (1998)'चा टायटल ट्रॅकही झळकला आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, दिग्दर्शक अली अब्बास यांना दोन अ‍ॅक्शन सुपरस्टार्ससोबत चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. तसेच या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का? 

(video : Tiger Shroff koo वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news